Kolhapur Market | कृषी उत्पन्न बाजार समितीत गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक | कोल्हापूर | ABP Majha
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. गूळ सौदे बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलंय. बाजार समितीचे सर्व गेट बंद करण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. कोल्हापूर बाजार समितीमध्ये हमालांची संख्या पाचशे तर गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या दीडशे आहे. बाजार समितीमध्ये दिवसाला वीस ते पंचवीस हजार गूळ रव्याची आवक होते. मात्र गूळ सौदे बंद राहिल्याने दिवसाला एक ते दीड कोटींची उलाढाल ठप्प झालीय.