Kolhapur : मेन राजाराम हायस्कूलचं स्थलांतर कुठेही होणार नाही, दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण
मेन राजाराम हायस्कूलचे कुठेही स्थलांतर होणार नाही. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे. एबीपी माझाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. दीपक केसरकर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे.