Kolhapur ST Bus : कोल्हापुरातून मुंबई-पुणेला जाणारी एसटी सेवा बंद : ABP Majha
जालन्यातील घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातून सोलापूर, जालना, धुळे, नगर, संभाजीनगर आणि लातूर या गावात जाणारी एकही बस सुटलेली नाही. या मार्गावर दररोज सहाशे साडेसहाशे बसेस धावतात..
रोज तेरा ते पंधरा हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जाळपोळ होऊ नये, याची काळजी घेत या बस पुण्यातच थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं बघायला मिळत आहे.