Kolhapur : घोडावत कारखान्याचा ऊस पुन्हा अडवला, स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक
कोल्हापुरात स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. घोडावत कारखान्याचा ऊस पुन्हा एकदा अडवण्यात आलाय... वाहन चालकाला दर देत नाही तोवर गाडी जाऊ देणार नाही, अशा घोषणा देत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी औरवाड फाट्याजवळ उसानं भरलेला ट्रॅक्टर आज पुन्हा अडवला...