Kolhapur Sulkud Water Supply Scheme : सुळकुड पाणी योजनेला विरोध करण्यासाठी मुश्रीफ-घाटगे एकत्र येणार?

पश्चिम महाराष्ट्रातून मोठी बातमी आहे. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक. हसन मुश्रीफ सध्याच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यावर घाटगे यांनी कागलमध्ये मोठं शक्तिप्रदर्शनही केलं होतं. मात्र हे राजकीय वैरी सध्या एका मुद्द्याविरोधात एकत्र आले आहेत, आणि तो मुद्दा म्हणजे इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेली सुळकुड पाणी योजना. ही योजना रद्द व्हावी अशी मुश्रीफ, घाटगे आणि संजय मंडलिक या तिघा नेत्यांची मागणी आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola