Kolhapur : RTO मध्ये महापुरुषांचे फोटो हटवून लावले भाजप नेत्यांचे फोटो; कोल्हापुरात शिवसेना आक्रमक
Kolhapur : कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (Kolhapur RTO) महापुरुषांचे फोटो काढून आता भाजप नेत्यांचे फोटो लावल्याचा आरोप शिवसेनेनं (Shiv Sena) केलाय. त्याविरोधात शिवसेनेनं आज आंदोलनही सुरु केलंय. कार्यालयाच्या दुरुस्तीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे फोटो काढण्यात आले. नूतनीकरणानंतर तिथं भाजपच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले असा आरोप शिवसेनेनं केलाय. महापुरुषांचे फोटो पुन्हा लावावेत अशी मागणी शिवसेनेनं आंदोलनाद्वारे केलीय.