Kolhapur : Panhala तालुक्यातील धारवाडीचा डोंगर खचला, घरांनाही भेगा ABP Majha
Kolhapur : Panhala तालुक्यातील धारवाडीचा डोंगर खचला, घरांनाही भेगा ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावलीय. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झालीय. पंचगंगा नदीने पाणीपातळी ४० फुटांवर पोहोचलीय. महत्त्वाचं म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेलेत. त्याचप्रमाणे, गगनबावडा तालुक्यात गेले चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे कुंभी नदीचे पाणी रस्त्यावर आलं. दरम्यान, कोल्हापुरातील पोर्ले तर्फ बोरगाव बंधाऱ्याजवळ पडसाळी रस्त्यावर पाणी आल्याने पडसाळी रस्ता पाण्याखाली गेला आहे... त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्याचा संपर्क तुटलाय.