Kolhapur : कोल्हापुरात लव जिहादचा प्रकार? 15 दिवसापासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जातेय... कोल्हापुरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले असल्याचा आरोप करण्यात आलाय... या घटनेला 15 दिवस उलटून गेले...मात्र अजून मुलीचा कोणताही सुगावा लागला नाही... याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय... तर पोलिसांकडून तीन पथक तैनात करण्यात आली आहेत...