Kolhapur Jyotiba Yatra : दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात, 10 लाख भाविक येण्याची शक्यता
Continues below advertisement
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात होतेय. या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असतात. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.यावेळी या यात्रेसाठी 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जातेय. या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे मानाच्या सासनकाठ्या... ही यात्रा बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पार्किंग व्यवस्था आणि दर्शन रांगांसाठी मोठी तयारीही करण्यात आलीय.
Continues below advertisement