Kolhapur Flood Update | पंचगंगा नदीची पाणीपातळी घटली, पावसाची विश्रांती; वाहतूक पूर्ववत
कोल्हापूरवरचं पुराचं संकट तूर्तास तरी टळलंय कारण पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी व्हायला सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीच्या खाली आली आहे. त्रेचाळीस फूट तीन इंचांपर्यंत पोहचलेली पातळी आता बेचाळीस फूट दहा इंचांपर्यंत कमी झाली आहे. काल सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा वाहतूक पूर्ववत झाली आहे. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरची वाहतूक अंशतः सुरू झाली आहे. प्रतिनिधी विजय केसरकर यांनी पाणीपातळी आणि वाहतुकीसंदर्भात अधिक माहिती दिली. कोल्हापूर आणि सांगली या भागातील पाणीपातळी आणि वाहतूक पूर्वपदावर येत असल्याची माहिती मिळाली आहे.