Kolhapur Eid Celebration : कोल्हापूरमध्ये मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण
Kolhapur Eid Celebration : कोल्हापूरमध्ये मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण आज रमजान ईदच्या निमित्त कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंग इथं मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं... विश्वशांती, बंधुभाव आणि अखंड भारत यासाठी प्रार्थना करत त्यांनी समतेचा संदेशही दिला. मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर पारंपारिक पद्धतीने नमाज पठण करण्यात आले. या प्रसंगी शाहू महाराज छत्रपती, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या...