Kolhapur : कोल्हापूरात ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर,नागरिकांचा रास्तारोको
Kolhapur : कोल्हापूरात ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर,नागरिकांचा रास्तारोको
स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर असल्याचा कोल्हापूर महापालिकेचा दावा फेल ठरलाय. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि मिश्रित सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आल्यानं संतप्त नागरिकांनी रास्तारोको केलाय. जवळपास अर्धा तासाच्या रास्ता रोको नंतर राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आंदोलकांशी रास्ता रोको करणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.