Kolhapur : करवीर तालुक्यातील अनेक भागात ढगफूटी सदृश्य पाऊस, वाहतूक विस्कळीत
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस झालाय.. काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळालं. या पावसामुळे ओढे, नाले ओव्हरफ्लो झालेत. ओढ्यांवर पाणी आल्याने वाहनचालकांची कसरत होत असल्याचे दिसून आलं. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.