Kolhapur Clash | सिद्धार्थनगरमध्ये दोन गटात राडा, दगडफेक, गाड्यांची तोडफोड

Continues below advertisement
कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 'सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. दोन्ही समाज शांत आहेत. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाहन केले आहे की, जे काही घडले ते गैरसमजातून झाले आहे,' असे पोलिसांनी स्पष्ट केले. वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या पोस्टर आणि साऊंड सिस्टिमला विरोध झाल्याने हा वाद उफाळला होता. दगडफेकीत सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola