Kolhapur Bailgada Sharyat : खासदार संजय मंडलिकांच्या विनापरवानगी बैलगाडा शर्यतीत अपघात,कारवाई होणार?
कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड येथे काल बैलगाडी शर्यत पार पडली. या शर्यतीत तीन ते चार अपघाताच्या घटना घडल्यात. यामध्ये पाच जण किरकोळ जखमी झालेत. एका अपघातामध्ये बैलगाड्यातून चालक फरपटत जात असल्याचं दिसतंय तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भरधाव बैलगाडी प्रेक्षकांमध्ये आल्यानं तीन ते चार प्रेक्षकांच्या अंगावरून ही बैलगाडी गेली. गंभीर बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय ही बैलगाडी शर्यत झालीय. आता याबाबत कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..