Kolhapur Accident : हृदयविकाराचा तीव्र झटका तरीही वाचवले विद्यार्थ्याचे प्राण
गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापुरात विघ्नहर्त्याचं दर्शन झालंय... कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात हृदयविकाराचा तीव्र झटका येत असताना देखील स्कूल बसच्या चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळवली आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचवलेत. मात्र स्कूल बस चालकाचा मृत्यू झालाय. सतीश कांबळे असं चालकाचे नाव आहे. आज भोगावती हायस्कूलचे विद्यार्थी घेऊन ही स्कूल बस शाळेच्या दिशेनं जात होती. पिंपळवाडी ते भोपळेवाडी मार्गावर कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी झाडावर घातली. आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचवलेत. एका प्रकारे हा चालक विद्यार्थ्यांसाठी विघ्नहर्ताचं ठरलाय.