Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापूर : देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून आली समोर आली आहे. अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनानंतर तज्ज्ञ समितीकडून आठ पानी अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने तज्ज्ञ समितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या पाहणीनंतर अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्या खालच्या भागाची झीज झाली आहे. 

चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणे गरजेचं

मूर्तीची झालेली झीज 2015 मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणे गरजेचं असल्याचे समितीने म्हटले आहे. संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने तडे जाऊन थर निघत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मूर्ती भक्कम करण्यासाठी ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून ते मुजवता येणं शक्य असल्याचेही म्हटले आहे. 

मूर्तीची पाहणी करुन अहवाल सादर 

मूर्तीची झीज झाल्याच्या पार्श्वभूमीवर संवर्धन करण्यासाठी दावा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापुरात याठिकाणी सुनावणी सुरु आहे. गजानन मुनीश्वर यांच्यासह इतरांनी पुरातत्व खात्याकडून निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार तज्ज्ञ समितीने पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर केला. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल असा सल्लाही समितीने दिला आहे. मूर्तीचे निरीक्षण करून काळजी घेणे. मूर्तीला खान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे, मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणे, गर्भगृहातील संगमरवर काढणे कीटकांचा उपद्रव होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करणे. आर्द्रता व तापमान यांचे नियंत्रण करणे अलंकार व किरीट घालताना योग्य ती काळजी घेणे अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram