Kolhapur Gold : कोल्हापुरात महिलेची 40 तोळे सोनं असलेली बॅग काही सेकंदात चोरट्याने लांबवली

मावस भावाच्या स्वागत समारंभासाठी बेळगावहून आलेल्या महिलेची ४० तोळे सोनं असलेली बॅग काही सेकंदात चोरट्याने लांबवली. कोल्हापूरच्या शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात ही घटना घडली आहे. चोरटा कशा पद्धतीने बॅग लंपास करतो याचे सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागले आहे. बेळगाव इथल्या केतन वीरेंद्र नंदेशवन यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.चोरट्याने लंपास केलेल्या पर्समध्ये ७.५ तोळ्यांचा हार, ५ तोळ्यांचा कोयरी हार, ३ तोळ्यांचे मंगळसूत्र, ५ तोळ्यांच्या बांगड्या, ५ तोळ्यांचे बाजूबंद, ३ तोळ्यांच्या अंगठ्या आणि दीड तोळे वजनाच्या रिंग्ज इतके दागिने होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola