Dhananjay Mahadik on Satej Patil : आता महाभारत होणार, महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा
इथून पुढे महाभारत होणार, धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना इशारा. आमचं ठरलंय म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला...गेल्या अडीच वर्षात प्रचंड त्रास दिला...आमच्यावर केसेस टाकल्या...अभिमन्यूला घेरल्यासारखं मला घेरलं होतं...पण मी बोललो होतो, सत्ता आमच्याकडे आली तर तुम्हाला झेपणार नाही...इथून पुढे महाभारत होणार...वाईटाचा नाश होणार आहे... चुळबुळ करून इकडे तिकडे उड्या मारणाऱ्यांनो आता हे चालणार नाही. एक प्रश्न सोडून सगळे प्रश्न सोडवले जाणार आहेत...थेट पाईपलाईन कामात मी लक्ष घालणार नाही. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष दिसतील