Dancing Peacock | पावसाची चाहूल, मोराचा सुंदर नाच! कोल्हापूरच्या न्यू पॅलेस परिसरातील मनमोहक दृश्यं!
कोल्हापूरमधील न्यू पॅलेस परिसरात पिसारा फुलवून नृत्य करणाऱ्या मोराचं मनमोहक दृश्यं पाहायला मिळालं. येत्या काही तासात राज्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पिसारा फुलवून नृत्य करणारा हा मोर पावसाची चाहुल लागल्याची जाणीव करुन देतोय.