Kolhapur : कोल्हापुरातील रंकाळ्यावर पर्यटकांची गर्दी, राज्यभरातून पर्यटक कोल्हापूरमध्ये दाखल
सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरातील रंकाळ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिरापासून अगदी काही अंतरावरच कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणजे रंकाळा तलाव आहे. सूर्य मावळतीला जात असतानाची दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात.संपूर्ण राज्यभरातून पर्यटक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. अनेक नागरिकांचा इथून पुढे कोकण आणि त्यानंतर गोवा असा प्लॅन तयार असतो.