Kolhapur Corona | चंदगडच्या तांबूळवाडी गावात 63 जण कोरोना पॉझिटिव्ह, गावात निरव शांतता | कोल्हापूर
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील तांबूळवाडी हे छोटंसं गावं आहे, या गावात तब्बल 63 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आहे. गावात पूर्णपणे निरव शांतता पसरलीय. एकही माणूस घराच्या बाहेर पडत नाही. यामुळे घरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत चंदगड तालुक्यात 325 कोरोनाबधित आढळले असून त्यापैकी 63 रुग्ण एकट्या तांबूळवाडी या गावातील आहेत, त्यामुळे तांबूळवाडी हे चंदगड तालुक्यातील हॉटस्पॉट बनलं आहे.