Ambabai Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईचं 200 रुपयांमध्ये VIP दर्शन, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

यंदाच्या नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही अशा भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा उपलब्ध केली आहे.... पेड दर्शन असू दे पण व्हीआयपी दर्शन नको म्हणत या निर्णयाचे काहीजण स्वागत करत आहेत... तर काहींनी विरोध दर्शवला आहे... व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली अनेकांना दर्शनासाठी सोडावं लागतं..त्यामध्येच देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा बहुतांश वेळ वाया जातो... त्यामुळे आता ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही त्यांच्यासाठी पेड ई-पासची सुविधा केली आहे...अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली...तर याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे....

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola