Kanjurmarg मेट्रो कारशेडमुळे राज्याचे 1 हजार 580 कोटी रुपये वाचणार, 9 सदस्यीय समितीचा अहवाल
मेट्रो कारशेडच्या अभ्यासासाठी राज्य सरकारनं राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापन केली होती. कांजुरमार्गच्या जागेत कारशेड उभारल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये राज्याचे 1 हजार 580 कोटी वाचतील, असं या समितीनं अहवालात म्हटलं आहे. तर, आरे येथील जागेपेक्षा कांजुरमार्ग येथील जागा अधिक मोठी आहे. आरेच्या कारशेडमध्ये केवळ 30 मेट्रो उभ्या राहू शकतात. तर कांजुरमार्ग येथील जागेत 55 मेट्रो उभ्या राहू शकतात, असं या समितीनं अहवालात म्हटलं आहे.
Tags :
Metro Metro Car Shed Mumbai Metro Car Shed Kanjurmarg Metro Aarey Supriya Sule CM Uddhav Thackeray