Kangana VS Raut| 9 सप्टेंबरला मुंबईत येणार, काय करायचं ते करा,कंगना रनौतचं संजय राऊतांना खुलं आव्हान

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच संजय राऊत यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे. कंगना रनौतसोबत माझं व्यक्तीगत भांडण नाहीये, पण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचं कृत्य, हे अत्यंत गंभीर आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, 'भाजप नेते आशिष शेलार कंगनाने मुंबईला अक्कल शिकव्याचं गरज नाही, असं म्हणाले. त्यांनी हे जरा अधिक जोरात बोललं पाहिजे होतं. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रवर एखादी व्यक्ती आशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिपणी करत असेल तर हा एका पक्षाचा विषय नाही. तर राज्यातील 11 कोटी जनतेचा विषय आहे.' ते पुढे बोलताना म्हणाले की, 'कंगनाला मराठी समजतं का? कंगनाने ट्विटर अकाउंट स्वतः चालवावं, कोणत्याही राजकीय पक्षाने नाही.'

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola