Rajesh Tope | अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली : आरोग्यमंत्री राजेश टोपे
दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्हाबंदी उठवली, हॉटेल सुरू केले आहे. तसेच कार्यालयात उपस्थिती वाढवली याचा हा परिणाम आहे. कोरोनाचा संसर्ग हा संपर्काने वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मास्क वापरले नाही तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तरीदेखील बाहेर फिरताना मास्क वापरत नाही. कोरोनाची भीती बाळगू नये परंतु जागरुक राहणे आवश्यक आहे, असे देखील ते म्हणाले.