Kanchan Gadkari : कांचन नितीन गडकरींना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्रदान
कांचन नितीन गडकरी यांनी शेतीत श्रीसूक्त आणि मंत्रोच्चार केल्याने पीक चांगले येते असा अनुभव सांगितला असून, नागपूरमध्ये त्यांना वसंतराव नाईक स्मृतीप्रित्यर्थ 'प्रयोगशील शेतकरी' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'त्यावेळला मी शेतामध्ये बसून श्रीसूक्त म्हणायचं, तर त्याला करोकरमाचं सोयाबीन खूप चांगल्या भावाने विकलं गेलंय,' असे त्यांनी सांगितले. मातीला मातेसमान मानून चांगले बियाणे पेरल्यास पीक दमदार येते, तसेच झाडांना संगीत ऐकवल्याने फळे-फुले चांगली येतात असेही त्यांनी नमूद केले.