Jitendra Awhad | बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई : मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारपरिषदेत याबाबतची घोषणा केली. परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला 22 वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांच हेच घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. चाळ क्रमांक एकमध्ये बाबासाहेबांचं स्मारक होणार असल्यानं तिथल्या रहिवाशांसाठी शेजारीच सरकारकडून नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola