Jitendra Awhad Daughter Reception in Goa : आधी साधेपणानं लग्न, मग गँड रिसेप्शन ABP Majha

गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं लग्न मुंबईत  7 डिसेंबरला अगदी साधेपणाने साजरं झालं. राज्यात एक चांगला आदर्श घालून दिला म्हणून आव्हाड कुटुंबियांचं सर्वत्र कौतुकही झालं. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर, खरंच आव्हाड यांनी मुलीचं लग्न साधेपणाने लावलं की केवळ दिखावा केला अशाप्रकारची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. काल गोव्यातील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेल मध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मंत्री आणि बडे कलाकार आणि परदेशातील पाहुणे उपस्थित होते. तर आज होणाऱ्या रिसेप्शनसाठी बडी मंडळी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola