JEE आणि NEET परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार, दिवाळींनतर परीक्षा घेण्याची मागणी फेटाळली
नवी दिल्ली : NEET आणि JEE परीक्षांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाचा निर्णय झाला आहे. या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. NEET आणि JEE परीक्षा वेळेतच होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका 6 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. 11 विविध राज्यांमधील 11 विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.