#Coronavirus | शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, गोविंदबागमधील 4 जणांना कोरोनाची लागण

Continues below advertisement

बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय आज ही संख्या 473 झाली आहे,  500 च्या जवळपास पोहोचली आहे.  पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासना कडून सांगण्यात येत आहे. गोविंदबागेतील जवळपास 50 कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी आज 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी 12 कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. दरम्यान, पवार नियमितपणे बारामती निवासस्थानी येत असतात, काही दिवसांपूर्वी त्यांचा बारामतीत दौरा होता, मात्र तो अचानक रद्द झाला. सध्या प्रशासनाच्या वतीने प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram