कोपरगाव शहरात दर रविवारी जनता कर्फ्यू, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय, नागरिकांचाही 100% प्रतिसाद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभाग अहोरात्र काम करत असून कोपरगाव तालुक्यात वाढता प्रादुर्भाव पाहता आता नागरिकांनी सुद्धा प्रशासनच्या बरोबर उभे राहत आठवड्यातून एक दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असून सध्या कोरोना बाधितांची संख्या 600 च्या जवळ पोहचली असून यापैकी 200 रुग्णांवर उपचार सुरू असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व साखळी तुटावी यासाठी प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येत असून केवळ अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच व्यवहार बंद ठेवले जात आहेत.