Jalna Car Fire : अपघातानंतर कारला आग लागल्याने महिलेचा कारमध्ये जळून मृत्यू
abp majha web team
Updated at:
23 Jun 2023 05:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारला आग लागून एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. शेगावमधील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन एक दाम्पत्य घरी गावाकडे परतत होतं. तळणी फाटा इथं त्यांच्य़ा स्विफ्ट कारला एका पिक-अपनं धडक दिली. पती तातडीनं खाली उतरला, आणि तेवढ्यात कारनं पेट घेतला. पत्नीला काही कळायच्या आतच तिला चारही बाजूंनी आगीनं घेरलं होतं. या आगीत होरपळून तिचा जागीच मृत्यू झाला. सविता सोळुंके असं या ३३ वर्षांच्या महिलेचं नाव आहे. आज पहाटे चार वाजता हा अपघात झाला.