Maratha Reservation Protest : गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलनाचा मराठा संघटनांचा इशारा

जालना येथे मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाकडून निषेध म्हणून आंदोलन करण्यात आल .  जालना तील घटनेचा तीव्र निषेध करत यावेळी संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यां करण्यात आली . पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत मराठा समाज बांधवांनी सरकार आणि लाठी चार्ज करणाऱ्या प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली . मराठा समाजात फक्त दोन टक्के श्रीमंत लोक असून संपूर्ण मराठा समाजाला यामुळे श्रीमंत ठरवलं जात असेल तर हा समज दिशाभूल करणारा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा असताना देखील मराठा समाजावर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर या सगळ्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात आंदोलन कर्त्यांकडून सरकारवर टीका करण्यात आली .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola