Manoj Jarange Jalna : चार-पाच दिवसांपासून आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू -मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Jalna : चार-पाच दिवसांपासून आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू -मनोज जरांगे

जालना : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) समोर आले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी पंतप्रधानांना वरती टीका केली नाही. त्यांचेच काही नेते मराठा समाजाचा द्वेष करतात. तिसऱ्यांदा सत्ता येऊ लागली म्हणून भीती दाखवत आहेत का? परिसरात मोदी साहेबांना इथेच राहण्याची वेळ आली होती. भाजपच्या चार दोन लोकांमुळे ही वेळ आली, जे सत्य ते मी सांगितलं. राज्यात सर्वच जातींचे हाल झाले आहेत. इथून पुढे त्या जातीचा स्वाभिमान जागा होणार आहे. यांनी काही जातीचे नेते संपवले आहेत.  काही जात संपवल्या आहेत. त्यांचे काही नेते आपला द्वेष करणे सोडत नाही, काड्या करणे, आंदोलन फोडणे, खोट्या केसेस करणे, हल्ले करणे सत्तेचा पदाचा दुरुपयोग करणे हे त्यांचे सुरूच असते, असा निशाणा त्यांनी यावेळी सरकारवर साधला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram