Manoj Jarange Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस, प्रकृती बिघडल्यानं जरांगेंना सलाईन
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे.जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक गावात तळ ठोकून आहे. दरम्यान खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी त्यांना आज सलाईन लावलंय., शरीरातील पाणी पातळी कमी होत असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची विचारपूस केली, तंसच तेथील सुरक्षेचा आढावा देखील घेतला.