
Manoj Jarange on Raj Thackeray : कुणालाही किंमत द्यायची नाही, मनोज जरांगे राज ठाकरेंवर संतापले
Manoj Jarange on Raj Thackeray, जालना : धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, या आंदोलनाबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना नाव न घेता राज ठाकरे यांच्यावरती टीका केली. आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये, त्यांच्यापुढे आंदोलन करण्याचे आणि त्यांना भेटायची काय गरज आहे, असा सवालही जरांगेंननी केलाय. गोरगरीब जनतेशी खेळणारे लोक असून आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांना शरद पवार यांनी उभं केलं असल्याच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आपण प्रकाश आंबेडकर यांचा आदर करतो त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे. राजकारण्यांना दाबायची हीच संधी आहे असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मनोज जरांगे यांनी बांगलादेशच्या परिस्थितीवरून धडा घेण्याचं अवाहन सरकारला केल आहे. आरक्षणाचा प्रचंड मोठा आक्रोश आहे. सर्वसामान्यांना त्रास दिल्यावर असं होतं हे सरकारने समजून घ्यावं. मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवणार नाही असेही जरांगे म्हणाले.