ABP News

Manoj Jarange on Maratha Reservation : ...याचं एकनाथ शिंदे यांना वाईट वाटायला हवं- मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange on Maratha Reservation : ...याचं एकनाथ शिंदे यांना वाईट वाटायला हवं- मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Maratha Reservation जालना: जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषणाला बसले. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

पुन्हा मला दोष देऊ नका- मनोज जरांगे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही संधी दिली असून पुन्हा मला दोष देऊ नका, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले. तसेच आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला. आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो , कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram