Jalna Steel It Raid : आयकरचं 'वऱ्हाड', ३९० कोटींचं घबाड; या ठिकाणी टाकले छापे
पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी कारवाई जालन्यात झालीय. जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
Tags :
Maharashtra Income Tax Department Jalna Jalna News Income Tax Raid IT Raids Maharashtra Income Tax Raid Maharashtra IT Raid Jalna Raid Jalna Steel Traders Jalna Maharashtra Income Tax Raids In Jalna It Raid Today Jalna News Today IT Raid Maharashtra Income Tax Raid