Jalna steel Raid :जालन्यात स्टील कारखानदारावर छापा,58 कोटींची रोकड,32 किलो सोनं,16 कोटींचा ऐवज जप्त
Continues below advertisement
पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी घटना जालन्यातही घडलीय. जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते.
Continues below advertisement