Jalna Lathicharge Maratha Reservation : लाठीचार्ज, गोंधळ, जाळपोळीनंतर जालन्यात सध्या वातावरण कसं?
काल जालन्यात पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मराठी आंदोलन चिघळलंय. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. मात्र उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये काल वाद झाला. त्याचं पर्यवसन झटापटीत झालं. त्यानंतर तिथं दगडफेक झाली. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला... शिवाय हवेत गोळीबारही केला... आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभर संताप व्यक्त होतोय... या घटनेनंतर सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर महाकाळा, वडिगोद्री, शहागडमध्ये एसटी पेटवण्यात आली. पोलिसांची गाडीही पेटवली. तिकडे सोलापूर धुळे मार्गावरील वडीगोद्रीत जाळपोळ करण्यात आली. २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. आणि सर्व प्रकार घडला.