Jalna IT Raid : आयकरचे जालन्यातील व्यावसायिक, डिलर आणि बँकेवर छापे, विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा यांच्या मालमत्तांवरही छापे

आयकर खात्यानं कुणावर छापे टाकले त्यांची नावं समोर आली आहेत. आयकर खात्याच्या पथकांनी जालन्यातील व्यावसायिक, डिलर आणि एका सहकारी बँकेवर छापे टाकले. त्यात जालन्यातील एसआरजे स्टीलकंपनी, कालिका स्टील कंपनीमध्ये छापे टाकण्यात आले. खासगी फायनान्सर विमलराज सिंघवी आणि डिलर प्रदीप बोरा यांच्या व्यापारी प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. या छाप्यात कुणाकडे किती संपत्ती सापडली याबाबत आयकर विभाग प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्याची शक्यता आहे. तूर्त कारवाई झालेल्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola