Jalna Dhangar Morcha : जालन्यातील धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण,जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक
Continues below advertisement
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना शहरात विशाल मोर्चा निघालाय. जालना शहरातील गांधी चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाकडून अनुसूचित जमातीमध्ये समावेशाच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. त्यातच सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर याबाबत कुठलीही हालचाल होत नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे.
Continues below advertisement