Daund Fire | दौंडच्या कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कंपनीत भीषण आग, कंपनी जळून खाक
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या शिवशक्ती ऑक्सिलेट या कंपनीला मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागली होती, शॉर्ट सर्किट होऊन मिश्रित केमिकला आग लागली असल्याच्या प्राथमिक अंदाज आहे, ही आग विझविण्यासाठी कुरकुंभ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या,बारामती MIDC ची एक गाडी, पुणे महानगरपालिका, दौंड नगरपालिका अशा एकूण पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते, आग सध्या आटोक्यात आली व कंपनीत काम करणाऱ्या 12 कामगारांना बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी नाही, मात्र संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे वेगवेगळ्या केमिकलचे विघटन करण्याची प्रक्रिया कंपनी केली जात होती . सध्या आग आटोक्यात आली असून रात्रीच्या वेळी आग लागल्याने परिसरात मध्ये धुरा चे लोट बाहेर पडत होते.