Jalna : जालन्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिली 'गुलाब, मोगऱ्याची फूल, भाव मिळत नसल्यानं संताप
जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये फुलांना भाव मिळत नसल्यानं फूल उत्पादक शेतकऱ्यासमोर सध्या संकटांचा डोंगर उभा ठाकलाय. गेल्या दोन महिन्यांपासून फुलांना म्हणावा तसा भाव मिळत नाहीये. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुल फेकून आपला संताप व्यक्त केलाय.गुलाब ,मोगरा यांच्यासह इतर फुलांना बाजारात 5 रुपये किलो भाव मिळत असून या मुळे उत्पादन खर्च तर सोडा साधा माल वाहतुकीचा खर्चही खिशातून करावा लागतोय. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीचा सामना करायचा कसा असा प्रश्न सध्या बळीराजासमोर आहे.