Ajit Pawar Jalna : नगरसेवक पदाच्या उमेदवारांना खुर्च्या न दिल्याने अजितदादा संतापले..

Continues below advertisement

Ajit Pawar Jalna : नगरसेवक पदाच्या उमेदवारांना खुर्च्या न दिल्याने अजितदादा संतापले..

जालना: जालन्यामध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खुर्ची न दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार संतापले.अजित पवारांनी (Ajit Pawar) माईक हातात घेत पोलिसांना देखील सुनावलं. डी झोनमध्ये उमेदवारांना येऊ देण्याची ताकीद त्यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना देखील झापलं आहे. व्यासपीठासमोर उमेदवारांना खुर्च्या देऊन बसवण्याचं आवाहन देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. जालन्यामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. (Ajit Pawar got angry after not giving a chair to a candidate for the post of corporator)

Ajit Pawar: नेमकं काय घडलं?

व्यासपीठावरती सर्वजण बसलेले होते, माईकसमोर एक जण माहिती देत होता, त्यावेळी अचानकपणे अजित पवार (Ajit Pawar) उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, मला पोलिसांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे.  माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या इथे समोर व्यासपीठासमोर लावा. मी सांगतो आहे, घ्या त्या खुर्च्या आणि समोर लावा. काढा त्या खुर्च्या कार्यकर्त्यांनो उठा. काढा त्या खुर्च्या, कळतं नाही काय, उमेदवार कोण आहेत, त्यांना इथे समोर बसवा,ये इकडे लावा खुर्च्या, चला, इकडे, समोर लावा खुर्च्या, सगळे उमेदवार पुढे या, सांगितलेलं कळतं नाही काय, खुर्च्या घ्या पटापट असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) संताप व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola