Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम

Continues below advertisement

Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम

 लोकल ट्रेनमध्ये चढताना हिंदीत बोलला त्यावरून तुला मराठी बोलता येत नाही का? यावरून वाद (Kalyan Local Train Crime News) झाला. काही तरुणांनी लोकल प्रवासात झालेल्या वादातून 19 वर्षीय अर्णव खैरे या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का?, असे बोलत यावरून मारहाण केली. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. झालेल्या मारहाणीमुळे अर्णव विद्यार्थी मानसिक तणावात होता. याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. अर्णव खैरे (Kalyan Arnav Khaire Case) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवचे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान लोकलमधली झुंडशाही, मराठी-हिंदी वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येत आहे. पोलिसांनी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola