Uddhav Thackeray Jalgaon Sabha : उद्धव ठाकरेंची जळगावमध्ये सभा, सभेची तयारी कशी सुरु?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तिसरी मोठी सभा आज जळगावच्या पाचोऱ्यात होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आलीये. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल झाले होते. तर राऊत यांच्यासह ठाकरे गटातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी देखील आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली. उद्धव ठाकरेंनी या आधीच्या सभेतून राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप-शिंदे सरकारचा समाचार घेतला होता. त्यामुळे आजच्या या सभेतून उद्धव ठाकरे कुणावर 'बाण' सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.