Kishor Patil on MVA Sabha: राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवायची सुपारी तर घेतली नाही ना ?- किशोर पाटील
ही माझ्या दिवंगत काकांसाठी सभा आहे त्यामूळे कुठलाही गालबोट लागणार नाही तसेच ही सभा शांततेत पार पाडावी याची जबाबदारी मी घेत असून आमचे नेते गुलाबराव पाटील यांनाही मी विनंती करणार - पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील
संजय राऊतांसह आयोजक आणि चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी वर किशोर पाटलांची सडकून टिका. माझी बहिण वैशाली दहा वेळा मातोश्रीवर गेली होती पण तिला उद्धव ठाकरे भेटले नव्हते, माझे काका दिवंगत नेते आर ओ पाटील यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आले देखील नाही. संजय राऊतांमुळे खर उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेवरून जळगाव मधील शिवसेनेच्या गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील या दोन नेत्यांची भिन्न भिन्न मते सभेच्या आयोजक वैशाली सूर्यवंशी यांचा कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.