Jalgaon Rain Update : जळगावच्या सुकी नदीपात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका : ABP Majha
Continues below advertisement
जळगावच्या रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. सुकी नदीपात्रात मधोमध नऊ पर्यटक अडकले होते. याबाबत काल संध्याकाळी साडेसहा वाजता स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिली.. नऊ जण पाण्याच्या प्रवाहात मधोमध होते आणि पाण्याचा प्रवाह वाढत होता. त्यामुळे हे सर्वजण वाहून जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र प्रशासाकडून तातडीने चक्र फिरली आणि घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात आलं. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नदीपात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली.
Continues below advertisement